Maharashtra Superfast News | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर | ABP Majha
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडी शिंदेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थित झाला शिवसेनेत प्रवेश.
'जे गेले ते गेले,त्यांच्यावर मी बोलत नाही..' संजना घाडींच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंच प्रतिक्रिया.
सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद, मुंबई महापालिकेसाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं, उद्धव ठाकरेंची माहिती.
रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का, १५ एप्रिलला अनिल नवगने यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत प्रवेश,
प्रवेशपूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर.
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,मुंबईतील पाणी प्रश्न, खड्डे , नालेसफाई या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती,या बैठकीला माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी आमदार प्रकाश सोळंकेंच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट,भेटीदरम्यान आमदार सोळंके आणि राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यात मतदार संघातील विविध विषयावर चर्चा झाल्याची माहिती